Friday, August 21, 2015

लाल तेरडा - Rosemary Leaved Balsam

लाल तेरडा ...
सह्याद्रीत ट्रेकिंगला जाणाऱ्या प्रत्येकाने पाहिलेच असेल असे हे फुल. कल्याणच्या पुढे कोणत्याही महामार्गाने गेल्यास रस्त्याच्या दुतर्फा लाल तेरड्याची फुले दिसतातच. जुलै ते सेप्टेंबर या महिन्यात घनगड, अंजनेरी, कास पठार यावर तर या फुलांचा गालिचाच पसरलेला असतो.
या फुलाला दमट हवामान लागते त्यामुळे ऑक्टोबर हिटनंतर हि फुले गायब होऊन जातात ते थेट पुढल्या पावसात पुन्हा भेटायला येण्यासाठी.

रंग: जांभळा, गुलाबी
आकार: दोन मोठ्या पाकळ्या, एक लहान पाकळी, जांभळट-गुलाबी देठ
रोपाची उंची: २-४ फुट
प्रकार: झुडूप



Common name: Rosemary Leaved Balsam • Marathi: लाल तेरडा Lal terda
Botanical name: Impatiens oppositifolia
Family: Balsaminaceae (Balsam family)
Synonyms: Impatiens rosmarinifolia

Tuesday, August 18, 2015

बेरकी, काप्रू - Common Begonia

ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात त्रिंगलवाडीचा ट्रेक केला.
ट्रेकक्षितीजचा रेफरन्स घेऊन इगतपुरीच्या वाघोळी कॉलोनीमधून आम्ही पुढे घाटाकडे निघालो. रस्ता फारच कच्चा होता. वाटेत २ शाळकरी मुले दिसली. त्यांनी याच वाटेने पुढे गेल्यास त्रिंगलवाडीचे धरण लागेल असे सांगितले. वाघोळी घाटातला रस्ता खूपच वाईट होता. रस्ता पाहून आम्ही गाडीमधून उतरून फक्त गाडी पुढे जाऊ द्यावी अस ठरवल.
गाडीतून उतरताच मला दिसली ती काप्रूची गुलाबी फुले. या फुलांना बेरकी, कॉमन बेगोनिया असही नाव आहे. हि फुले कानपेट सारखीच पावसाळ्यात येणारी.
रंग: गुलाबी
आकार: २ मोठ्या २ लहान पाकळ्या, मध्ये भगव्या पिवळसर रंगाचे परागकण.
रोपाची उंची: ३-४ फुट



Common name: Common Begonia • Marathi: Berki, Motiyen, काप्रु Kapru
Botanical name: Begonia crenata Family: Begoniaceae (Begonia family)

Thursday, August 13, 2015

कानपेट, केणी - Swamp Dayflower

केणी, कानपेट....
काय मस्त नावे आहेत ना :) हे फुल माझ खूप आवडत. दोन निळे निळे मोठाले कान, पिवळे पिवळे शेंडे असलेले परागकण, खाली काचेसारखी तोंडे ....
पावसात सह्याद्रीमध्ये फिरताना या फुलाची नक्की गाठ पडणार..
खालील फुल इगतपुरी येथे टिपलेले आहे...
रंग: नीळा
आकार: दोन मोठ्या कानासारख्या पाकळ्या, २ पाकळ्या पारदर्शक निळसर रंगाच्या, मधोमध पिवळसर परागकणाचे ३-४ तुरे
रोपाची उंची: २-३ फुट



अधिक माहिती : http://www.flowersofindia.net/catalog/slides/Swamp%20Dayflower.html

Common name: Swamp Dayflower • Hindi: केना Kena • Manipuri: ৱাঙদেন খোবী Wangden khobi •Kannada: Kanjura • Konkani: केनी Keni

Botanical name: Commelina paludosa
Family: Commelinaceae (Dayflower family)
Synonyms: Commelina obliqua