Friday, August 21, 2015

लाल तेरडा - Rosemary Leaved Balsam

लाल तेरडा ...
सह्याद्रीत ट्रेकिंगला जाणाऱ्या प्रत्येकाने पाहिलेच असेल असे हे फुल. कल्याणच्या पुढे कोणत्याही महामार्गाने गेल्यास रस्त्याच्या दुतर्फा लाल तेरड्याची फुले दिसतातच. जुलै ते सेप्टेंबर या महिन्यात घनगड, अंजनेरी, कास पठार यावर तर या फुलांचा गालिचाच पसरलेला असतो.
या फुलाला दमट हवामान लागते त्यामुळे ऑक्टोबर हिटनंतर हि फुले गायब होऊन जातात ते थेट पुढल्या पावसात पुन्हा भेटायला येण्यासाठी.

रंग: जांभळा, गुलाबी
आकार: दोन मोठ्या पाकळ्या, एक लहान पाकळी, जांभळट-गुलाबी देठ
रोपाची उंची: २-४ फुट
प्रकार: झुडूप



Common name: Rosemary Leaved Balsam • Marathi: लाल तेरडा Lal terda
Botanical name: Impatiens oppositifolia
Family: Balsaminaceae (Balsam family)
Synonyms: Impatiens rosmarinifolia

Tuesday, August 18, 2015

बेरकी, काप्रू - Common Begonia

ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात त्रिंगलवाडीचा ट्रेक केला.
ट्रेकक्षितीजचा रेफरन्स घेऊन इगतपुरीच्या वाघोळी कॉलोनीमधून आम्ही पुढे घाटाकडे निघालो. रस्ता फारच कच्चा होता. वाटेत २ शाळकरी मुले दिसली. त्यांनी याच वाटेने पुढे गेल्यास त्रिंगलवाडीचे धरण लागेल असे सांगितले. वाघोळी घाटातला रस्ता खूपच वाईट होता. रस्ता पाहून आम्ही गाडीमधून उतरून फक्त गाडी पुढे जाऊ द्यावी अस ठरवल.
गाडीतून उतरताच मला दिसली ती काप्रूची गुलाबी फुले. या फुलांना बेरकी, कॉमन बेगोनिया असही नाव आहे. हि फुले कानपेट सारखीच पावसाळ्यात येणारी.
रंग: गुलाबी
आकार: २ मोठ्या २ लहान पाकळ्या, मध्ये भगव्या पिवळसर रंगाचे परागकण.
रोपाची उंची: ३-४ फुट



Common name: Common Begonia • Marathi: Berki, Motiyen, काप्रु Kapru
Botanical name: Begonia crenata Family: Begoniaceae (Begonia family)

Thursday, August 13, 2015

कानपेट, केणी - Swamp Dayflower

केणी, कानपेट....
काय मस्त नावे आहेत ना :) हे फुल माझ खूप आवडत. दोन निळे निळे मोठाले कान, पिवळे पिवळे शेंडे असलेले परागकण, खाली काचेसारखी तोंडे ....
पावसात सह्याद्रीमध्ये फिरताना या फुलाची नक्की गाठ पडणार..
खालील फुल इगतपुरी येथे टिपलेले आहे...
रंग: नीळा
आकार: दोन मोठ्या कानासारख्या पाकळ्या, २ पाकळ्या पारदर्शक निळसर रंगाच्या, मधोमध पिवळसर परागकणाचे ३-४ तुरे
रोपाची उंची: २-३ फुट



अधिक माहिती : http://www.flowersofindia.net/catalog/slides/Swamp%20Dayflower.html

Common name: Swamp Dayflower • Hindi: केना Kena • Manipuri: ৱাঙদেন খোবী Wangden khobi •Kannada: Kanjura • Konkani: केनी Keni

Botanical name: Commelina paludosa
Family: Commelinaceae (Dayflower family)
Synonyms: Commelina obliqua

ताम्हण, जारुल - Pride of India, Queen Crape Myrtle

या ब्लॉगची पहिली पोस्ट महाराष्ट्र राज्याच्या राज्य फुलाला समर्पित ..
ताम्हण हे उष्ण प्रदेशातील झाड आहे. याची फुले जांभळ्या गुलाबी कागदासारखी दिसणारी असतात. याला हिंदी मध्ये जारुल म्हणतात. भारतीय पोस्टाने या फुलाचे तिकीट काढून यास मान दिला आहे.
या झाडाची पाने डायबेटीज या रोगावरील औषधांमध्ये वापरली जातात.
रंग: जांभळा
फुलाचा आकार: कागदासारख्या वाटणाऱ्या जांभळ्या पाकळ्या,  मधोमध तांबूस पिवळ्या परागकणांचा गुच्छ
झाडाची उंची: १०-१५ फुट

Source: Google
ताम्हण, जारुल  Photo: From Google

स्त्रोत थेट निसर्गातून : https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=640492386050930&id=514448648655305

प्राईड ऑफ ईंडिया, क्विन ऑफ फ्लॉवर , जायंट क्रेप मर्टल अशी विविध ईंग्रजी नावं मिरवणारं हे सुंदर फ़ुल आपल्या राज्याचं फ़ुलं म्हणुन ओळखलं जातं. पळसाचा सरता पुष्पोत्सव भर उन्हाळ्यात तामणाला जणू खो देतो नी हे मध्यम आकाराच हिरवं डेरेदार झाड जांभळट गुलाबी फ़ुलांनी बहरुन जातं. १००% भारतिय असलेलं हे सुंदर झाडं महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व भागात आढळतं. हिंदी भाषेत जारुल म्हणुन ओळखलं जाणारं हे झाडं आपल्या विदर्भाकडेही जारूल म्हणुनच ओळखलं जातं. कोकणात याला मोठा बोंडारा म्हणतात कारण याला जी फ़ळं येतात ती मोठ्या बोंडासारखी दिसतात. " ल्यॆगरस्ट्रोमिआ रेगिनी " [ Lagerstroemia reginae ] असं वनस्पतीशास्त्रिय नाव धारण केलेलं, मेंदीच्या कुटुंबातलं [लिथ्रेसी - Family Lythraceae] हे झाड एका स्विडिश निसर्ग अभ्यासकाच्या नावाचं [ Magnus von Lagerstroem ] स्मरण आहे. प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ लिनियस [ Carl Linnaeus ] याला या झाडाचे नमुने लॆगरस्ट्रोमने नेउन दिले म्हणुन आपल्या मित्राच्या सन्मानार्थ त्याने या झाडाचे नाव ठेवले. साधारण ५० ते ६० फ़ुट ऊंच वाढणारं हे देखणं झाड लांबुळक्या पानांनी समृद्ध असतं. साधारण १० ते १५ सेमी लांबीची वरुन हिरवीगार नी खालच्या बाजूने फ़िक्कट हिरवी पानं आणि गुलाबी जांभळी फ़ुलं हे या झाडाच वैशिष्ठ म्हणता येउ शकतं.या झाडाची साल साधारण पिवळट भुरकट रंगाची आणि गुळगुळीत असते. या सालीचे नियमित पापुद्रे गळून पडतात अगदी पेरुच्या झाडासारखे. हिवाळ्यात बहुतांश झाडांप्रमाणे ह्याही झाडाची पानं तांबडट होवुन गळून पडतात.

खालील माहिती स्त्रोत : http://www.flowersofindia.net/catalog/slides/Queen%20Crape%20Myrtle.html

Common name: Pride of India, Queen Crape Myrtle • Hindi: Jarul जरुल • Manipuri: Jarol • Tamil: கதலி Kadali • Marathi: Taman
Botanical name: Lagerstroemia speciosa
Family: Lythraceae (Crape Myrtle family)

This tropical flowering tree is one of the most outstanding summer bloomers. Lagerstroemia speciosa is a larger form of the more commonly grown L. indica (Crape myrtle.) It is called Queen Crape Myrtle because it's the Queen of the Crape Myrtles, dominating with grand size and larger, crinkled flowers. The name Crape myrtle is given to these tree/shrubs because of the flowers which look as if made from delicate crape paper. Lagerstroemia speciosa is a large tree growing up to 50' but it can be kept smaller by trimming. It stands on an attractive, spotted bark that often peels. This bark is commercially used and is a valuable timber. The large leaves are also appealing as they turn red right before they drop in the winter. A postal stamp was issued by the Indian Postal Department to commemorate this flower.

Medicinal uses:  Seeds are narcotic; bark and leaves are purgative; roots areastringent, stimulant and febrifuge (fever removing) In Manipur, the fruit is used as local application for apathe of the mouth. Decoction of dried leaves is used in diabetes.